बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विनायक मेटे यांचं अकाली निधन मनाला वेदना देणारं”

मुंबई | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनायक मेटे यांच्या निधनावर शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीये.

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो, अशा शोकभावना शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनी व्यक्त केल्या आहेत.

अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधानपरिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असे , त्यांच्या अशा अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती आली समोर, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

…म्हणून विनायक मेटेंना जीव गमवावा लागला, समोर आली मोठी माहिती

अपघात नेमका कसा झाला?, विनायक मेटेंच्या ड्रायव्हरनं सांगितली आपबीती!

अपघातानंतर विनायक मेटेंचा शेवटचा फोटो आला समोर

“ते तासभर गाडीतच पडून होते, मी रस्त्यावर झोपलो वाहनांना हात केला पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More