महाराष्ट्र मुंबई

राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार- उद्धव ठाकरे

मुंबई  | महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठं स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

हॉटेल्स आणि लॉज सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. तसेच हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, असं उद्धव ठाकरेंनी सांगिंतलं आहे.

दरम्यान, कोणत्याही हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण

100 जणांना वाढदिवसाची पार्टी देणाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

महत्वाच्या बातम्या-

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित

आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10,000 लोक; तीन गावं करावी लागली सील

‘या’ नेत्याची जीभ घसरली, निर्मला सीतारमण यांची केली काळ्या नागिणीशी तुलना

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.