बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गिरणी कामगारांसाठी उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

मुंबई | मुंबईतील सर्व गिरणी कामगारांना आता एमएमआरडीए परिसरातच राज्य सरकार घरं बांघून देणार असल्याची माहिती आहे. कामगारांच्या घरांसाठीची पहिली लॉटरी 1 मार्च रोजी निघणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

आजच बैठक होती ती गिरणी कामगारांच्या घरांसाठी. गिरणी कामगार आहेत त्यांना जे आमचं वचन होतं की गिरणी कामगारांना घरं देणार. ती योजना सुद्धा हे सरकार प्रभावीपणे राबवत आहे आणि त्या सर्व गिरणी कामगारांना हे सरकार घरं देईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सह्याद्री अतिथी गृहात गिरणी कामगारांच्या नेत्यासोबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. याच बैठकीत सध्या मुंबईत उपलब्ध असलेली 45 हजार घरं गिरणी कामगारांना देण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं गिरणी कामगार नेत्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर गिरीणी कामगारांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

कर्जमाफाची पहिली यादी उद्या जाहीर करणार- मुख्यमंत्री

सरकार काम करतंय हे विरोधकांना पचत नाही- उद्धव ठाकरे 

महत्वाच्या बातम्या- 

इंदोरीकर महाराजांना धारेवर धरू नये- पद्मश्री पोपटराव पवार

एल्गार परिषदेच्या तपासाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

धोबी, परीट समाजाला अनुसूचित जातींमधील सहभागावरून फडणवीसांनी केला गौप्यस्फोट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More