मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातलेला पाहायला मिळत आहे. कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरें आणि टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधला.
सर्वसामान्य माणसांच्या मनात कोरोनाची प्रचंड दहशत आहे. कोविडची लढाई मोठी, भयानक आणि जीवघेणी आहे. या लढाईत लढण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना सोबत येण्यासाठी मी साद घालत असल्याचं उद्धव ठाकरे डॉक्टरांना म्हणाले. कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी “माझा डॉक्टर” म्हणून ज्यांची ओळख आहे त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. चला, सर्वांच्या सहकार्यातून आपण करोना विषाणुचा नायनाट करूया, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या कुटुंबाच्या डॉक्टरावर ठेवतात. त्या माझ्या डॉक्टरांनी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या योग्यवेळी, योग्य उपचाराचे शिवधनुष्य उचलावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांना यावेळी बोलताना केलं.
दरम्यान, कोविड झाल्यानंतर रुग्णाचं शरीर साखरेचं पोतं होऊ नये आणि ज्यांना डाबेटिस आहे ते नियंत्रित ठेवणं, इतर सहव्याधींवरही नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. तर आपल्याला संकट वेळीच रोखता येईल. घऱच्या घऱी उपचाराची जबाबदारी आपण घेतली पाहिजे असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘डोळ्यांदेखत रुग्ण जीव सोडताहेत अन् आम्ही हतबलपणे पाहतोय’; डॉक्टर ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ
…अन्यथा तुमच्यावर कारवाई करणार; सलमान खानची कायदेशीर कारवाईची धमकी
गोड बोलून त्याला जवळ बोलावलं अन् नंतर महिलेनं त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला; धक्कादायक कारण आलं समोर
पुण्यात रंगला मुळशी पॅटर्नचा थरार! भरदिवसा रस्त्यात तरूणावर सपासप वार करत केला खून, पाहा व्हिडीओ
खळबळजनक! घरी क्वारंटाईन असलेल्या कोरोनाग्रस्त महिलेवर पाच जणांकडून गँगरेप
Comments are closed.