मुंबई | शेवटी हे युद्ध आहेच परंतु आयुष्याचं युद्ध आपण रोज लढत असतो. ते सुरू असताना अचानक त्याला ब्रेक लागणं. हे सुद्धा लोकांच्या मनावर अतिशय विचत्र पद्धतीने आघात करत असल्याचं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सगळ्यातून सावरण्याचं दडपण माझ्यावर देखील होतं. पण जर मी खचलो असतो तर काय? हा एक मुद्दा होता. लढणं आहेच, लढण्याशिवाय पर्याय नसल्याचं ठाकरेंनी सांगितलं. कोविड योद्धा म्हणून इलेक्ट्रानिक मीडियामधील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यावेळी ते बोलत होते.
हार माननं तर शक्य नाही. मोठी जबाबदारी आहे. लढल्याशिवाय आपण यातून बाहेर पडू शकत नसल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना विरोधात लढण्यासाठी आतातरी आपल्याकडे मास्क हेच एकमेव आयुध आहे. तसेच हात धुणे व अंतर ठेवणं हे देखील महत्वाचं असल्याचं आवाहनही ठाकरेंनी नागरिकांना केलं.
थोडक्यात बातम्या-
मराठी मालिकांमध्ये सोज्वळ अभिनयासाठी फेमस; आता इन्स्टावर टाकले बिकिनीतले फोटो
आयपीएलच्या स्पर्धेत १० संघ खेळवण्याच्या प्रस्तावाला मान्यता, परंतु…
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक
काय सांगता! आता ग्रामपंचायतीच करणार वीजबिलाची वसुली!!!
“सत्तासुंदरी हातची गेल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था देवदाससारखी”