Top News महाराष्ट्र मुंबई

“महाविकास आघाडी सरकार फुटायला काही गंमत आहे का?, हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा”

मुंबई | महाविकास आघाडी सरकार फुटायला काही गंमत आहे का? हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा, असं जाहीर आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना केलं आहे. ‘लोकसत्ता’च्या 73 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसतं. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात देशात नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात हे सूचित केलं.

मागील भाजपचे सरकार पारदर्शकतेचा दावा करायचं त्यांनी लावलेली 30 कोटी झाडे पारदर्शक असतील म्हणूनच लोकांना दिसत नसल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, ‘प्रधानसेवक’ म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जमीन राज्याला विकासकामांसाठी मिळावी यासाठी काम करून लोकांची सेवा करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का?”

कोणताही प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही- अमित शहा

अबबबब… आतापर्यंत गप्प असलेल्या सेलिब्रेटींना एकाकी फुटली वाचा

करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

शेतकरी आंदोलन : सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्विटनं एकच खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या