बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तृणमूल काँग्रेसच्या विजयाचं संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावं- उद्धव ठाकरे

मुबंई | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असं दिसत आहे. पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावं लागेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे आणि हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपलं असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडल्यानंतर आता निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाची लढाई ममता बॅनर्जी हारल्या आहेत. 1622 मतांनी त्यांचा पराभव झाला असून भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी या अटातटीच्या सामन्यात विजय मिळवला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे”

“अवताडेंचा विजय आघाडी सरकारच्या थोबाडीत मारल्यासारखा, फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात”

कसा झाला समाधान आवताडे यांचा विजय?, पाहा कशी कशी मिळाली मतं

“संज्या, तू स्वत: कधी निवडून येणार ते आधी सांग”

“तुम्ही फक्त जामिनावर सुटलात, जोरात बोलू नका नाहीतर महागात पडेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More