मुंबई | नागरीकत्व सिद्धं करणं हे केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाणार असल्याचं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.
सीएए म्हणजे कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. महत्वाचं म्हणजे नागरिकत्व सिद्धं करणं हे केवळ मुस्लिमांपुरतं नाही, तर ते हिंदूंनासुद्धा जड जाईल आणि तो कायदा मी येऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं. गुलाबाचा गुलकंद हा अनेकांना ज्यांना बद्धकोष्ट असतो त्यांच्यासाठी उपचारसुद्धा असतो असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकत्त्व कायद्यावर काय भूमिका घेतात?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे आता मुख्यमंत्र्यांचं मत स्पष्ट झालं आहे.
दै. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत प्रसरित होतेय 3,4 आणि 5 फेब्रुवारीला. ही संपूर्ण मुलाखत https://t.co/fmd1gD2biy वर पहायला मिळेल pic.twitter.com/oOaTLbOKyM
— Saamana (@Saamanaonline) February 2, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“प्रत्येक सरकार मराठा समाजातील मुलामुलींसाठी जागा भरण्याच्या घोषणा करतायेत”
लोणीकर, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुपडा साफ करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर
महत्वाच्या बातम्या-
देशाचं विभाजन करत असलेलं राजकारण थांबवा- सोनम कपूर
तहसीलदारबाई हिरोईनसारख्या दिसतात म्हणणाऱ्या लोणीकरांची सारवासारव, म्हणतात…
विश्व हिंदू महासभेच्या नेत्याची डोक्यात गोळ्या घालून हत्या!
Comments are closed.