“संजय राठोडांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं”
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा दिला. वर्षा बंगल्यावर जात संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राठोड यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. तपास हा झाला पाहिजे. तो निष्पक्षपातीच असला पाहिजे. पण एखाद्याला लटकवायचं आणि आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सरकार चालवताना आमची जबाबदारी असते की न्यायाने वागणं. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले?, गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कोणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी पोलिसांवर अविश्वास दाखवणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, तुमच्या काळातही हीच तपास यंत्रणा होती. ज्या पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत आहात. तुमच्या काळातही त्यांनीच तपास केला होता. मग आता अविश्वास कसा दाखवता? पोलीस हा सरकारचा कणा असतो, अशावेळी त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे, असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या-
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर नारायण राणे म्हणाले…
“फक्त राजीनामा नव्हे…” चित्रा वाघ यांच्या ‘या’ नव्या मागणीने संजय राठोडांचा पाय आणखी खोलात
संजय राठोडांनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; फडणवीसांनी दिलं आश्चर्यचकीत करणारं उत्तर
भाजपनं अतिशय घाणेरडं राजकारण केलं, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी- संजय राठोड
राजीनामा दिला म्हणजे हे प्रकरण संपलं असं होत नाही- प्रविण दरेकर
Comments are closed.