Top News नागपूर महाराष्ट्र

‘विदर्भवासियांनो मी तुम्हाला वचन देतो की…’; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

नागपूर | विदर्भवासियांना एक वचन देतो की तुमच्यावर कधीही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कोण करत असेल तर ढाल म्हणून उभे राहू. तुमच्या हक्काची व्यक्ती, सरकार म्हणून उभे राहू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशन घेऊ शकलो नाही ही एक क्लेषकारक गोष्ट आहे. त्यानिमित्ताने विदर्भात येणं होतं, राहणं होतं. विदर्भातील आपली लोकं भेटतात. त्यांच्या काही व्यथा, प्रश्न, वेदना असतात त्यांची जाणीव होते आणि मार्ग निघत असल्याचं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री बोलत असताना माईकचा आवाज बंद झाला तेव्हा,  नागपूरवाले मला म्यूट का करत आहे?, असा टोमणाही ठाकरेंनी लगावला.

थोडक्यात बातम्या-

“6 जूनला राज्यभरात साजरा केला जाणार ‘शिव स्वराज्य दिन’”

अभिमानास्पद! DSP लेकीला आपल्या बापाचा कडक सॅल्यूट

“औरंगाबाद नामांतराच्या मुद्दावरून शिवसेनेनं राजकारण न करता ठाम भूमिका घ्यावी”

राजकारणात प्रवेश करणार का?, सोनू सूद म्हणाला…

अखिलेश यादव यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्यांना कोरोना लसीवर शंका, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या