बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राजीव गांधींप्रमाणे क्रांती करण्यासाठी ते खातं…’; उद्धव ठाकरेंचा खुलासा

मुंबई | शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाच्या पार्श्वभूमीवर सेनेचे खासदार आणि दैनिक सामना (Samna) वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विशेष मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली तर आपल्या आजारपणातील काही घटना सांगत, गौप्यस्फोट देखील केले. त्यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) खातेवाटपावर भाष्य केलं आहे.

या मुलाखतीत त्यांनी काही खाती आपल्याजवळ ठेवण्याची कारणं सांगितली. मला काही कुजबूज ऐकू आली. काय हे मुख्यमंत्री आहेत? नगरविकास खाते तसे मलाईदार खाते. ते वास्तविक मुख्यमंत्र्यांकडे असायला हवे. पण मी ते विश्वासाने एकनाथ शिंदे यांना दिले, तसेच मी माझ्याकडे ठेवलेली खाती म्हणजे सामान्य प्रशासन आणि न्याय व विधी, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

आणखी महत्वाचं खातं म्हणजे तत्रज्ञान खातं (आयटी) ते मी स्वत: जवळ याकरिता ठेवलं होतं की, त्याचा वापर इतर खात्यांसाठीच्या कामाकरीता होईल. मला राजीव गांधींनी (Rajeev Gandhi, Former Prime Minister of India) तंत्रज्ञान क्षेत्राते केली तशी प्रगती करायची होती. म्हणून त्या खात्यावर मी होतो, असं ठाकरे म्हणाले. तसेच दुसऱ्या एका मंत्र्याने दिवे लावले म्हणून त्याचं खातं देखील माझ्याकडे आलं, असं देखील ठाकरे म्हणाले.

त्यांंनी य् मुलाखतीत शिंदे गटावर सडकून टीका केली. आधी पक्ष पळवला आता माझे वडिल पळवत आहेत. स्वत: चे किंवा तुमच्या आई वडिलांचा फोटो लावून मते मागवा आणि निवडणूका जिंका. ज्या शिवसेनेने यांना सामांन्यातून असामान्य केले, मोठे केले, त्याच शिवसेनेला हे लोक गिळायला निघाले आहेत, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

संसदेबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची टीका, म्हणाले…

नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’

“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत” 

काळजी घ्या! ‘या’ लोकांना मंकीपॉक्सचा सर्वात जास्त धोका, महत्त्वाची माहिती समोर

‘एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का?’; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More