Top News महाराष्ट्र मुंबई

‘आयटीआय’मध्ये मोठा बदल होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

मुंबई | आयटीआयमध्ये मुलांना काळाशी सुसंगत तसेच नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कौशल्य विकास विभाग आणि विविध कॉर्पोरेट्स यांच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या या उपक्रमास राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्ययावतीकरण करणं. तसेच कोकणाचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी ‘कोकणफ्युचर पार्क’सारखे उपक्रम राबविण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

राज्यातील तरुणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या अनुषंगाने आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, असं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजी आणि इतर कॉर्पोरेट संस्थांच्या सहयोगातून राज्यातील 419 शासकीय आयटीआय आणि 53 टेक्निकल स्कूल्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ खडसेंची भोसरी भूखंड प्रकरणी ईडी कार्यालयात चौकशी!

राज्यात 34 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान!

‘हे’ कारण सांगत सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापित समितीतून भूपिंदरसिंग मान बाहेर

रेणू शर्माच नव्हे तर त्यांचा वकीलही वादग्रस्त; या गोष्टीमुळे अडचणी वाढणार?

भाजप नेत्यामुळे धनंजय मुंडेंना राजकीय जीवदान; राजीनामा देणार नाहीत?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या