बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेचं व्यसन हा अमली प्रकार, या अमली प्रकाराचा बंदोबस्त कुणी करायचा?”

मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात आणि देशात भाजप तपास यंत्रणांच्या गैरवापर होत आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर ईडी आणि अन्य तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी सत्तेची चटक आणि सत्तेच व्यसन लागलं की, काहीचं कळत नाही. कोणाच्या पत्नीची आणि मुलांची चौकशी करायची, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष केलं आहे.

सत्तेची लालसी, सत्तापिपासू अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हाला सत्ता पाहिजे ना ती देतो, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी एकंदरीत भाषणात भाजपच्या धोरणांवर टीका केली आहे. सत्तेचं व्यसन हे एक अमली प्रकार आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोणी करायचा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच आपली सर्व ठिकाणी सत्ता असावी असं काही जणांना वाटतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते,असं म्हटलं होतं. भाजपमध्ये गेल्यावर कुंभकर्णासारखी झोप लागते. दरवाजा वाजवला तरी जाग येत नाही,असं म्हणत भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

थोडक्यात बातम्या-

ना रोहित, ना विराट बॉलिवूडचा भाईजान ‘या’ दोन खेळाडूंचा झालाय जबरा फॅन!

“मराठी-अमराठी गाडून हिंदूत्वाची भक्कम एकजूट बांधा”

“केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलोय”

“माझे पोलीस माफिया असतील तर यूपीचे पोलीस भारतभूषण आहेत का?”

“एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्रावर ॲसिड फेकताय, अरे कुठे फेडाल हे पाप”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More