उद्धव ठाकरेंनी सांगितलं प्रकाश आंबेडकरांबरोबरच्या युतीचं कारण
मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत (Vanchit Bahujan Aghadi) युतीची जाहीर घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी युतीचं कारण सांगितलं आहे.
देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे, असं दोन्ही पक्षांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय.
शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीच्या घोषणेवेळी उद्धव ठाकरे म्हणाले, देशात ठाकरे आणि आंबेडकर या नावाला इतिसाह आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळात वाईट प्रथांवर आघात केला. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरु आहे. त्यामुळे आम्ही आज एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
दरम्यान, युतीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध सुधारतील का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास काहीच अडचण नाही, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- “बाळासाहेबांची ती इच्छा मोदींनी पूर्ण केली”
- “उद्धव ठाकरे फक्त आता शिल्लक सेनेचे प्रमुख आहेत”
- पॉर्न इंडस्ट्रीपासून लांब असलेली मिया खलिफा चर्चेत; फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
- Hyundai vs Maruti | ह्युंदाईची ही छोटी कार मारुतीला देणार टक्कर?
- “कोट कोट ह्रदयांचा केवळ एक ह्रदयसम्राट”
नेते राहुल गांधी यांनी का यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली आहे. यामध्ये राहुल गांधींना खाण्यास काय आवडतं? नोकरी केली का? तसेच लग्न करण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Comments are closed.