महाराष्ट्र मुंबई

आजच्या दिवशी मला गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण येतीये- उद्धव ठाकरे

मुंबई | राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजच्या दिवशी मला बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण येतीये, असं उद्धव म्हणाले आहेत..

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं राममंदिरासाठी मोठं योगदान आहे, म्हणून मी त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असं उद्धव यांनी सांगितलं आहे. तसंच मी अयोध्येला देखील जाणार आहे, असंही ते म्हणाले.

24 नोव्हेंबरला जाऊन जी मूठभर माती तिथे नेऊन ठेवली, त्यामुळे हा चमत्कार घडला असावा. न्यायव्यवस्थेचे आभार मानतो त्यांनी हा बरेच दिवस प्रलंबित असलेल्या खटल्यात न्याय मिळवून दिला. गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद मिटला आहे, अशा भावना उद्धव यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, आनंद जरूर साजरा करा पण वेडंवाकडं काही करू नका. या नव्या पर्वाचं आपण सर्वांनी चांगल्याप्रकारे स्वागत करूया. हा समजूतदारपणा दाखविल्यामुळे हिंदुस्थान एक महासत्ता बनेल हा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या