Top News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली असल्याची माहिती समोर आली आहे. पाणीपट्टीची ही रक्कम 24 लाख 56 हजार 469 इतकी आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 24 लाख 56 हजार 469 थकबाकी असल्याचं समोर आलं.

दरम्यान, सर्वसामान्यांप्रमाणे मंत्र्यांवरही कारवाई केली जाणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पदड्याआड- अजित पवार

धक्कादायक! समुद्रकिनारी प्राचीन वस्तु म्हणून आणली घरी पण घडलं विचित्रच

ईडीने खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी केली- प्रताप सरनाईक

धक्कादायक! पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमध्ये महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न!

3 कोटी काय अद्याप 1 रूपयाही खर्च केला नाही; धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या