Top News महाराष्ट्र मुंबई

भूमीपूजन सोहळा पार पडताच शिवसेनेची मोठी घोषणा, संजय राऊतांना केलं ऐलान…

मुंबई |   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल रामजन्मभूमी अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मंदिराची पायाभरणी करण्यात आली. या सगळ्यांमध्ये शिवसेनेला अयोध्येतल्या कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं, ही चर्चा संपूर्ण देशात पाहायला मिळाली. त्यानंतर शिवसेनेने आता नवी घोषणा केली आहे.

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार आहेत. तसंच शिवसेना तेथे थाटामाटात आणि भव्यदिव्य कार्यक्रम घेणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

कालचा कार्यक्रम हा सरकारी कार्यक्रम होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाचे श्रेय कुणीही घेऊ नये. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरू शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचं योगदान मोठं आहे. तसंच शिवसेनेचं योगदान आहे तसंच यामध्ये अनेकांचे योगदान आहे. घुमट काढण्यात शिवसैनिकांचं मोठा वाटा आहे, असं राऊत म्हणाले.

राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, ही आनंदाची गोष्ट आहे. हा सरकारी कार्यक्रम असून, तो मुहूर्त महत्त्वाचा होता. काही दिवसांनी उद्धव ठाकरे अयोध्येत जातील तेथे मनोभावे रामलल्लाचे दर्शन घेतील. तिथे जाण्यात कसलं आलंय राजकारण?, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून आईनंच मुलांसह स्वतःच्या हाताच्या धारदार ब्लेडनं नसा कापल्या; खळबळजनक घटना!

जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी वर्णी लागलेले मनोज सिन्हा कोण आहेत? जाणून घ्या…

भूमीपूजन सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले….

माझं दैवत गेलं…. अनिलभैय्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचा आमदार ढसाढसा रडला…!

राम मंदिरावर ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री गडकरींची पहिली प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या