बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे”

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये 2022 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. शिवसेनेनं उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलीये. यासंदर्भात शिवसेना उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी पत्रक जारी केलं आहे. अशातच आता याच विषयावरुन भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्यांना शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना निवडणुकीच्या या सर्व घोषणा राज्यातील घडामोडींवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी केल्या जात आहेत. यापूर्वी बिहारमध्ये निवडणूक लढवताना शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होण्याबरोबरच काही उमेदवारांना 100 मतही पडली नव्हती. मात्र उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असं म्हणत किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षानं कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षानं दिले आहेत. यासंदर्भात एक पत्रकही शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी प्रकाशित केलं होतं.

दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा सभा निवडणुका होणार असून आता सगळ्यांचंच लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –  

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही…’; महत्त्वाची माहिती समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं अक्षय कुमारला पत्र, म्हणाले…

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More