बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

मुंबई | या वर्षीच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशानंतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगली रंगलेली पाहायला मिळत आहे. तसेच शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात विरोधकांवर आरोप करण्यात येत आहे. याच आरोपांवर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केलं आहे.

यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात मुळात त्यांना 12 आमदारांचं शल्य बोचतंय, हा कबूली जबाबच नोंदवला. परंतू एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर, नाभिक समाजातील गजानन कडू वाघ, कोविड योद्धा डॉ. गणेश शेळके यांना ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारामुळे आपली जीवन यात्रा संपवावी लागली असल्याचं म्हटलं आहे.

या सगळ्याविषयी खरंतर ठाकरे सरकारला काहीच देणंघेणं नाहीये. फक्त मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून मात्र पळ काढायचा असल्याचं म्हणतच गोपीचंद पडळकरांनी ठाकरे सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.

तसेच पडळकरांनी काल उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील काही सेकंदाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तो शेअर करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार मित्रांच्या प्रश्नांपासून नी कसा पळ काढला, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर याबाबत संजय राऊत सामनाच्या अग्रलेखात का बरळला नाहीत?, की हा मुख्यमंत्र्यांनी पाडलेला लोकशाहीचा नवीन पायंडा तुम्हाला आवडलाय? असा खोचक सवालही पडळकरांनी या ठिकाणी विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो’; शरद पवारांकडून आठवणींना उजाळा

अंतराळात बनणार पार्क; ‘ही’ प्रसिद्ध व्यक्ती करणार प्रवास

अभिनेता सुयश टिळकने सर्वांना दिला सुखद धक्का; ‘या’ अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा

‘आदित्य ठाकरे हे ठाकरेंचे वंशज आहेत का?’; शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर नितेश राणेंकडून वक्तव्य मागे

“…मग ईडीने देवेंद्र फडणवीसांची चौकशी का करु नये?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More