बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“येत्या 40 दिवसात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल”

नाशिक | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साधू हत्या पाप फेडावे लागेल. आणि अनिल देशमुख यांना साधूंचा तळतळाट भोवला असल्याचं मोठं वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केलं आहे. ते आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.

अनिल देशमुख यांना पालघर येथील साधु हत्येचा तळतळाट लागला असून त्यामुळेच त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा असून त्यांनाही हे पाप फेडावे लागणार असल्याची टीका आचार्य तुषार भोसले यांनी केली आणि येत्या 40 दिवसांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असा दावाही आचार्य तुषार भोसले यांनी केला.

महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे वन मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्याने त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांनाही आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं.

आचार्य तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना सडकून टीका केली आणि ठाकरे सरकारची उलटीगिनती सुरू झाली असल्याचं म्हणत 40 दिवसात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल. असा दावा केला आहे.

थोडक्यात बातम्या

करिनाच्या धाकट्या लेकाचा फोटो चुकून झाला व्हायरल; असा दिसतो तैमुरचा लहान भाऊ

आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

आयपीएलआधीच शुभमन गिलचा ट्रेलर; 35 चेंडूत काढल्या एवढ्या धावा

गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

राज ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केल्या ‘या’ 8 सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More