महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल का?, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
नवी दिल्ली | शिंदेगटाकडे जर बहुमत असेल तर त्यांनी मुंबईत यावं गुवाहाटीत का थांबला आहात?. जर अडीच वर्षे सोबत होता तर आता का तक्रारी करत आहात? असा थेट प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे गटाला विचारला आहे. तसेच या लढाईत उद्धव ठाकरे यांचा विजय होईल, असा विश्वास दिल्लीतील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारवरचं संकट पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? असा प्रश्न विचारला असता राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता कमी असल्याचं शरद पवार म्हणाले. आसाममध्ये गेलेल्या शिंदे गटाचा सत्ता परिवर्तनाचा प्रयोग सुरू आहे. शिंदेकडून नवीन आघाडीचा प्रयत्न केला जातोय पण आमचा आजच्या आघाडीला पाठिंबा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
40-50 आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तरी संघटनेवर काही परिणाम होणार नाही. शिवसैनिकांची आपल्या संघटनेसाठी कष्ट करण्याची तयार आहे, असं शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, हे बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर पुन्हा शिवसेनेत येतील, असा दावा शरद पवार आणि शिवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहे. आता यापुढे शिंदे गट काय पाऊल ऊचलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या
“40 बंडखोर आमदारांच्या फक्त बॉड्या महाराष्ट्रात येणार”
बंडखोर आमदारांना ‘नाच्या’ म्हणत राऊतांचा गंभीर इशारा, म्हणाले…
“हवा, पाणी, डोंगर, हॉटेल आपल्या राज्यातही आहे, या इकडे”
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन
“राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, त्यामुळे…”
Comments are closed.