बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत मराठा आरक्षणाबाबत दाखवा”

मुंबई | मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना पुढचा मार्ग दाखवलेला आहे. कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेलं आहे. माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना हात जोडून विनंती करतोय. ज्याप्रमाणे काश्मीरमधील कलम 370 हटवताना तुम्ही तत्परता दाखवली तशीच तत्परता आणि हिंमत आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दाखवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा पास केला, तो मंजूर केला गेला, त्याला आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयात लढाई जिंकलो, त्याला आव्हान देण्यात आलं. त्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात ती लढाई लढलो आणि दुर्दैवाने आज हा निराशाजनक निकाल लढाईच्या ऐन भरात आलाय. मराठा आरक्षण रद्द करणं दुर्दैवी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मराठा समाजाला एक वेगळ्या दृष्टीनं धन्यवाद देतोय. त्यांनी फार समंजसपणानं हा निर्णय स्वीकारलेला आहे. कुठेही थयथयाट केला नाही, आदळआपट केली नाही, त्याबद्दल मराठा बांधव माता-भगिनींना हात जोडून धन्यवाद देतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच यावेळी  छत्रपती संभाजी राजे यांनी अत्यंत समंजसपणे आपली प्रतिक्रिया दिली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलं.

सरकार आरक्षणाच्या विरोधात असतं तर समजू शकलो असतो. सरकार आपल्यासाठी लढतंय. आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडतंय. तरीसुद्धा हा निराशाजनक निर्णय आल्यानंतरही लढाई संपलेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

कुणाच्या भडकवण्याला बळी पडू नका, सरकार तुमच्यासोबत आहे- उद्धव ठाकरे

मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की…- उद्धव ठाकरे

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

कडक सॅल्यूट! पंक्चर काढणाऱ्या 60 वर्षीय नागरिकाने दिले 90 ऑक्सिजन सिलेंडर

हृदयद्रावक घटना, एकुलत्या एक मुलाचा कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच आईनेही सोडले प्राण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More