बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा मालमत्ता कर माफ करणार’; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

मुंबई | राज्यातील कायम वास्तव्य करत असलेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांना घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेतंर्गत हा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माजी सैनिकांबरोबरच ‘फोर्स वन’मधील जवानांसाठी महत्त्वाची घोषणा केली.

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘फोर्स वन’ची उभारणी करण्यात आली होती. या फोर्स वनला आपण आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, ‘फोर्स वन’ मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

कुणाच्याही टीकेची पर्वा न करता मुंबईकरांच्या हितासाठी कामं करणारच- उद्धव ठाकरे

रोषणाई करा, फराळ बनवा, पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका- उद्धव ठाकरे

राष्ट्राध्यक्षपद गेलं; आता बायकोही सोडून जाण्याच्या तयारीत

पवार साहेब फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी; बायडेन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

अर्णब यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी सरकारची असेल- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More