बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी

मुंबई | एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फुट पाडली आणि नंतर भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे. त्यांच्या या बंडामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेच्या एकूण 55 आमदारांपैकी 39 आमदार शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपणच खरी शिवसेना, असा दावा केला होता. आता त्यांच्या या दाव्याला शिवसेनेनं फेटाळलं आहे.

यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कारवाई केली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेच्या पक्षनेते पदावरुन हाकलपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेने शिंदेंना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत शिंदेंनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडाला शिवसेनेच्या 39 आणि अपक्ष 10 आमदारांनी साथ दिली. शिंदे गट सरकारमधून बाहेर पडल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्याच माणसांनी ही वेळ आणल्याची ते राजीनामा देताना म्हणाले.

शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेनाप्रमुख हे सर्वोच्च पद आहे. आणि या पदालाच राष्ट्रीय कार्यकारणीच्या संगनमताने कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षनेते अधिकारात चार जणांचा पक्षनेते म्हणून निवड केली होती. या चौघांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार ठाकरे यांच्याकडे आहेत. अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ आणि एकनाथ शिंदे अशी चार जणांची त्यांनी पक्षनेते म्हणून निवड केली होती. आता पक्षविरोधी ठपका ठेवत ठाकरेंनी शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरुन हाकलपट्टी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘कोरोनासाठी एलियन्स जबाबदार’, किम जोंग उनचा विचित्र दावा

“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”

राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव, पत्र लिहित म्हणाले…

संजय राऊतांची चौकशी सुरू असलेलं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय, वाचा सविस्तर

‘…तर महाविकास आघाडी स्थापन करण्याची गरज नसती पडली’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More