Top News

उद्धव ठाकरे युतीचा निर्णय जाहीर करणार?? हालचालींना वेग

मुंबई |  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची ‘मातोश्री’वर उद्या एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना-भाजप युतीचा निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करणार आहेत, असं कळतयं.

युतीसाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून आग्रह केला जात आहे पण शिवसेना मात्र आपल्या एकला चलो रे च्या भूमिकेवर ठाम आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी वारंवार सांगितले आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजसोबत आपला रूसव्या-फुगव्याचा संसार सुरू ठेवते की आपली वेगळी चूल मांडते, हेच पाहायचंय.

महत्वाच्या बातम्या-

युतीसाठी भाजपकडून शिवेसेनेसमोर नवा फॉर्म्युला??

‘मास्तर धोनी’ चक्क मराठीतून मार्गदर्शन करतो तेव्हा…!

-तीन चार रुपयांमध्ये हॉटेलात कपभर चहा मिळतो का? -शरद पवार

“अण्णा तुम्ही सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका”

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या