मुंबईतल्या उद्धव ठाकरेंच्या ‘घणाघाती भाषणातील’ प्रमुख मुद्दे एकाच ठिकाणी

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे लोकाधिकार समिती महासंघ या अधिवेशनामध्ये घणाघाती भाषण केले.

वाचा या भाषणातील सर्व प्रमुख मुद्दे एकाच ठिकाणी:-

1. लाट कसली लाट लाटेची लावू वाट, उध्दव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. 

2. सरकार मजबूर असलं तरी चालेल पण देश मजबूत असला पाहिजे.

3. देशाचा प्रवास विचित्र पद्धतीने चालू आहे.

4. फक्त 2019 नाही तर पुढची सगळी वर्ष आपली असणारं आहेत.

5. विष्णुचा अवतार राम मंदीर बांधू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.  

6. आमची वाट ही भगवी वाट आहे, शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही.

7. आपल्याच छाताडावर बसणारं सरकार असेल तर मग ते चुलीत फेकून द्यायचे नाही तर काय करायचे? उद्धव ठाकरेंचा सवाल

8. विश्वास गमावला तर युद्ध जिंकणे अशक्य होते.

9. किती लाटा आल्या आणि गेल्या अशा लाटांना मी घाबरत नाही, उद्धव यांच मोदींवर टीकास्त्र.

10. जातीला पोट असतं पण पोटाला जातं लावू नका.

11. आरक्षण दिलं पण नोकऱ्या किती आहेत, एकदाचं जाहीर करुन टाका.

12. ‘फसल’ योजना फसलेली.

13. आम्हाला कुणीही लेचेपेचे समजू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

14. जो पक्ष देव, देश आणि धर्म यासाठी लढेल तो पक्ष जिंकल्याशिवाय राहणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेला पटकणारा पैदा झाला नाही आणि पैदा होणारही नाही- उद्धव ठाकरे

-विष्णुचा अवतार राम मंदिर बांधू शकत नाही- उद्धव ठाकरे

-लाट कसली लाट, लाटेची लावू वाट; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

-डाॅ. डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शरद पवार म्हणतात…!

-मुन्नाभाई एमबीबीएस मधील ‘हा’ अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता