बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंच्या सभेला मैदान कमी पडेल, एवढी गर्दी होईल”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्या सभांनंतर शिवसेनेकडून सभेची घोषणा करण्यात आलेली आहे. भारतीय आर्युविमा रौप्य महोत्सवामध्ये उद्धव ठाकरेंनी काय तो सवाल जबाब होऊन जाऊदे, असं वक्तव्य केलं होतं. त्यातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

मनसे नेते आमचे मार्गदर्शक नाहीत. आम्हाला बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे. याचा त्यांना पोटशुळ आहे. ही सभा अभूतपुर्व होणार आहे हे त्यांना माहित आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला मैदान कमी पडेल. उद्या त्याची प्रचिती दिसेल. त्यामुळे याला आडवं कसं जायचं हे ते पाहत आहेत. निवडणुका कधीही होऊदेत, शिवसेना ताकदीने लढणार आहे, असं अनिल परब म्हणाले आहेत.

अनिल परब यांनी यावेळी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांना फक्त एकचं काम आहे. त्यामुळे कोण काय बोलतय याकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचं लक्ष 14 तारखेवर आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभांमध्ये शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांनी थेट नाव घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय प्रत्युत्तर देणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या”

‘महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर…’; शिवसेना आमदाराचा गंभीर इशारा

“काळ साक्षी आहे, वंशवाद आणि धर्मावर आधारीत असलेली सत्ता टिकत नाही”

“महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे, कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही”

गुड न्यूज! यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More