मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे. कथित 19 बंगले प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे यांनी स्वत:च स्वत:चे 19 बंगले गायब केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि 19 बंगल्यांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी अशी मागणीही यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

मुख्यमंत्री म्हणून स्वत:च 15 जानेवारी 2021 ला चौकशीचे आदेश दिले. चौकशी कुणी करायची, कशी करायची, कुठे करायची, काय करायची, हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच ठरवलं, असं सोमय्यांनी सांगितलं.

त्यानंतर चौकशीच्या नावाने बंगले गायब झालेल्या जागेचे फोटोसेशन करायचे आणि त्याचा रिपोर्ट मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-