बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना लढ्यात राजकारण नकाे, राजकीय पक्षांना समज द्या’; उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

मुुंबई | लसीच्या तुटवड्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. अशात गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलंही राजकारण आणू नये म्हणून सांगावं अशी आग्रही मागणी केली आहे.

मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

दरम्यान, महासाथीवरुन देशभरात राजकारण केलं जात आहे. देशातील लोकांची सेवा करणं आमची जबाबदारी आहे. मला यावर काहीचं बोलायची इच्छा नाही. जे राजकारण करीत आहेत, ते करीतच आहेत. सर्व मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी पुढे यावं, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तसेच मी देशातील तरुणांना आवाहन करत आहे की, त्यांनी आपल्या जवळील व्यक्ती ज्यांचं वय 45 हून अधिक आहे, त्याचं लसीकरण करण्यासाठी मदत करावी, असं मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘किमान संकट काळात तरी राजकारण करू नका’; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

काळजी घ्या! कोरोनाची ही नवी लक्षणं आली समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

‘महाराष्ट्राच्या नावावर काय खपवताय?’; राजेश टोपे संतापले

‘क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More