महाराष्ट्र मुंबई

“देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा”

मुंबई | फडणवीस दिल्लीत गेले पाहिजे. त्यांचा अभ्यास चांगला आहे. ते देशाचा विचार करतात. मोठा विचार करतात. त्यांनी दिल्लीत जावं, अशी मुनगंटीवार यांचीही इच्छा आहे, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांनी हा चिमटा काढताच, आमच्या मित्राच्या तुम्ही का मागे लागलात? असा टोला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. त्यामुळे सभागृहात हास्याच्या कारंज्या उडाल्या.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मराठा आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण कोर्टात वकिलांची फौज उभी केली आहे. ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत- अजित पवार

प्रतिक्षा संपली! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी मुहूर्त सापडला

“रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही”

चिंताजनक! ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवीन विषाणू

नरेंद्र मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या