बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे ‘प्रबोधनकार ठाकरे’ इज बॅक”

मुंबई | दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी मुंबईतील षन्मुखानंद सभागृगात पार पडला. या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी देशातील विविध राजकीय मुद्दयांना हात घालत त्यावर भाष्य केलं आहे. त्यांच्या आजच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कौतुक केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख यांचे दसरा मेळाव्यातील आजचे भाषण म्हणजे ‘सौ सोनार की एक लोहार’ असं होतं. महाराष्ट्राच्या मनातील अनेक वर्षांची खदखद देशासमोर मांडल्याबद्दल उद्धवजी ठाकरे यांचे आभार असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला ‘प्रबोधनकार ठाकरे इज बॅक’ असं ट्विट अमोल मिटकरींनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्या भाषणात राज्यात भाजपकडून होत असलेल्या सरकार पाडण्याच्या दाव्यास जाहीर आव्हान दिलं आहे.  भाजपने सरकार पाडून दाखवावं. तसेच राज्यात सत्ता मिळवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना एकतर्फी प्रेमासारखं आहे. मुलीनं नाही म्हटलं म्हणून ॲसिड फेकतो त्याप्रमाणे आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कुणावर टीका करायची म्हणून मी बोलत नाही, पण आतातरी सुधरा. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. आपला देश सर्वात तरुण पण त्यांच्याकडे काम नाही. त्यांना काम नसणं हा मोठा बॅाम्ब ठरु शकतो आणि लक्षात ठेवा तो तुमच्या बुडाखाली फुटेल, असं उद्धव ठाकरेंनी आज मेळाव्यात म्हटलं होतं.

वाचा ट्विट – 

थोडक्यात बातम्या – 

ना रोहित, ना विराट बॉलिवूडचा भाईजान ‘या’ दोन खेळाडूंचा झालाय जबरा फॅन!

“मराठी-अमराठी गाडून हिंदूत्वाची भक्कम एकजूट बांधा”

“केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलोय”

“माझे पोलीस माफिया असतील तर यूपीचे पोलीस भारतभूषण आहेत का?”

“एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्रावर ॲसिड फेकताय, अरे कुठे फेडाल हे पाप”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More