बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी आपणासही विनंती करु इच्छितो की…’; उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना रोखठोक उत्तर

मुंबई | येत्या 5 जुलै आणि 6 जुलै या दोन दिवशी पावसाळी अधिवेशन पार पाडणार आहे. मात्र अद्याप विधानसभा अध्यक्षपदाची निवड झालेली नाही. गेल्या अधिवेशनाप्रमाणे यावेळी अधिवेशन अध्यक्षाविना होऊ नये यासाठी, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा, याबद्दल सरकारला आठवण करून दिली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला पत्राने रोखठोक उत्तर दिलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणार नाही. त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही. सध्या नरहरी झिरवळ यांच्याकडेच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. यात कोणत्याही घटनात्मक तरतुदीचा भंग झालेला नाही किंवा घटनात्मक अडचण आली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत सर्व सदस्यांना सहभागी होता यावं, अशा पद्धतीनं निवडणूक घेणं योग्य होईल, याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील बहुतांश राज्यातही अल्प कालावधीची अधिवेशने घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही. ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारचीही इच्छा आणि प्रयत्न आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्य शासनास इतर मागास प्रवर्गाची काळजी आहे. राजकीय प्रतिनिधीत्वासाठी मागासपणा निश्चित करण्याकरीता इम्पिरीकल डेटा आवश्यक आहे. मी आपणांसही विनंती करु इच्छितो की, आपणही आपल्या स्तरावर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन इतर मागास प्रवर्गाच्या 2011 मधील जनगणनेमधील इम्पिरीकल डेटा मिळवून द्यावा, जेणेकरुन पुढील आवश्यक पाऊले उचलणं राज्य शासनास शक्य होईल, असं उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! आळंदीच्या नगराध्यक्षांसह इतके वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा

शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून द्रविडचं नाव?; कोण असेल भारतीय संघाचा नवा कोच

“भाजपने ईडी आणि सीबीआयचं वॉरंट पाठवून कोरोना व्हायरसला अटक करणं एवढंच बाकीये”

“महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, PM केअर फंडातले हजारो कोटी मृतांच्या नातेवाईकांना द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More