दादागिरी करून याल तर ती मोडून काढू, दादागिरी कशी मोडायची हे…- उद्धव ठाकरे
मुंबई | राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि भोंग्यांवरून जोरदार राजकारण पेटलं आहे. राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला अट्टहास त्यांना चांगलाच महागात पडला आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंनी आपल्या ठाकरी भाषेत सर्वांना उत्तर दिलं आहे.
आमच्या घरीच हनुमान चालीसा म्हणायची होती तर चांगल्या भाषेत सांगायला हवं होतं. निरोप धाडायला हवा होता. पण दादागिरी करून याल तर दादागिरी मोडून काढू, असं रोखठोक शब्दात राणा दाम्पत्याला ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. दादागिरी कशी मोडायची ही आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मातोश्रीवर याअगोदरही खूप पाहुणे येऊन गेले आहेत माॅं आणि बाळासाहेबांनी त्यांचं स्वागत केलं आहे. तसंच आम्ही देखील तुमचं स्वागत केलं असतं, असंही ठाकरे म्हणाले आहेत. सध्या नवहिंदूत्ववादी, तकलादू हिंदूत्ववादी अशी जमात आलीय, तुमचा भगवा श्रेष्ठ की आमचा भगवा श्रेष्ठ ही स्पर्धा लागली, असंही ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, आमचं हिंदूत्व घंटाधारी नाही तर आमचं हिंदूत्व हे गदाधारी आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे. ठाकरेंच्या खास शैलितील भाषणानंतर राज्यात चर्चांणा उधाण आलं आहे.
थोडक्यात बातम्या –
सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ शिवसेना नेत्याला अटक
मुंबई उच्च न्यायालयानं राणा दाम्पत्याला झाप झाप झापलं!
“भारताचे पुढील पंतप्रधान गौतम अदानी होणार”
“माझे शब्द लिहून ठेवा, एक दिवस ऊसामुळं आत्महत्येची वेळ येईल”
‘मी खालच्या जातीची असल्याचं म्हणत त्यांनी मला…’; नवनीत राणांचा अत्यंत गंभीर आरोप
Comments are closed.