बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंचा स्वभाव खूप सकारात्मक; अशोक चव्हाणांकडून जाहीर कौतुक

नांदेड | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव खूप सकारात्मक आहे, अशा शब्दात राज्याचे सर्वजनिक कामगार मंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार हेमंत पाटील यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांची तोंड भरुन स्तुती केली आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नांदेडमध्ये दैनिक सत्यप्रभा या दिवाळी अंकाचे रात्री प्रकाशन पार पडले. त्यावेळी अशोक चव्हाण आणि खासदार हेमंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.

“स्वप्नात देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल, असं कोणाला वाटलं नव्हतं. आम्ही तर कधी असा विचार देखील केला नव्हता. मात्र वर्षभरापूर्वी पवारसाहेब, सोनियाजी आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत”, असं अशोक चव्हाण  म्हणाले.

तसेच सत्यप्रभा या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी हेमंत पाटील यांनीही टोलेबाजी केली. पाटील म्हणाले की “आठ दिवस ज्या वर्तमानपत्रामुळे मी तुरुंगात राहिलो त्याच दिवाळी अंकाचं माझ्या हस्ते उद्घाटन होतंय, यापेक्षा अधिक भाग्याची कोणती गोष्ट असते”.

महत्वाच्या बातम्या-

अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत; प्रमोद सावंत

मला मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही- नितीश कुमार

..तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का?- प्रवीण दरेकर

“राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत”

“नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More