उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; एसआयटी मार्फत चौकशी होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| विधीमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर(Eknath Shinde) भूखंड प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे(Uddhab Thackeray) यांची कोंडी करण्यात आली आहे.

शुक्रवारी सभागृहात बोलताना आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

उमेश कोल्हे प्रकरण तत्कालीन एसपी आरती सिंग यांनी गांभीर्यानं घेतलं नाही. दरोड्याचे प्रकरण म्हणत सिंग यांनी वेळकाढूपणा केला. दरोडा प्रकरण म्हणून या प्रकरणाचा तपास करण्यात आला तो तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून, असा आरोप राणांनी ठाकरेंवर केला आहे.

या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत झाला पाहीजे, अशी मागणीही राणा यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला शंभूराज देसाई यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळं या प्रकरणाची येणाऱ्या काळात चौकशी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-