उद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत!

मुंबई | अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी हाक देणारे उद्धव ठाकरे यांना आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत हे ध्यानात नाही आले का? असा सवाल कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी उपस्थित केला.

कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समिती 27 नोव्हेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे, यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते.

शिवसेनेने भाजपसोबत सोबत जागावाटपाची बोलणी करण्याआधी भूसंपादनाचा आदेश व रिफायनरी रद्द करण्याची अट ठेवावी, असंही ते म्हणाले.

दरम्यान, कोकणचे गॅस चेंबर करू नका, असा प्रचार जेव्हा शिवसेना नेते करतात तेव्हा त्यांची किव करावीशी वाटते, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार?; विनायक मेटेंचा सवाल

-आगोदर आपल्या लोकांना संभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी

-आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे

-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-हिंम्मत असेल तर ‘सदाशिव पेठे’चं नाव ‘ठाकरे पेठ’ करा!