Top News विधानसभा निवडणूक 2019

उद्धव ठाकरेंनी तर सांगितलं शिवसेनेचाच मुख्यमंत्री… पण काँग्रेस म्हणतंय आम्ही विरोधातच बसणार!

मुंबई | महाराष्ट्रात आता आपलचं सरकार येणार आहे. आता पालखीचे भोई व्हायचं नाही तर शिवसैनिक  मुख्यमंत्रिपदी बसवायचा आणि तो मी कोणत्याही परिस्थितीत बसवणारच, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. पण जे काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार, असं वृत्त होतं त्याच काँग्रेसने आता विरोधी पक्षात बसण्याची भूमिका कायम ठेवली आहे, असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे.

जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी तेवढे आकडे देखील नाहीयेत. म्हणून आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत, अशी खरगे यांनी सांगितलं आहे. परंतू या निर्णयाचे सर्वाधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आहे, असंही खरगे सांगायला विसरले नाहीत.

काँग्रेसने ही भूमिका घेतल्याने शिवसेनेची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. भाजप जर सत्तास्थापन करू शकलं नाही तर शिवसेना आता 145 संख्याबळ कसं जमवणार, हा मोठा प्रश्न आहे.

दरम्यान, भाजपची मुंबईत कोअर कमिटीची बैठक पार पडत आहे. सत्तास्थापन करायची की विरोधात बसायचं, याचा निर्णय या बैठकीत होतो आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या