महाराष्ट्र मुंबई

…तर अजित पवारांनीच सर्वात पहिला भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता!

मुंबई | गंभीर गुन्हे आणि चौकशींची तलवार डोक्यावर असलेले लोक भीतीपोटी भाजप-शिवसेनेमध्ये पक्षांतर करत असतील तर सर्वात पहिले अजित पवारांनीच भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजप-सेनेत आयारामांची संख्या वाढली आहे. त्यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’च्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

सत्तेचावापर करून भाजप-सेना फोडाफोडीचं राजकारण करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

दरम्यान, राजकारणात तोडा, फोडा आणि राज्य करा, असा ब्रिटीश नितीचा अवलंब जिल्हा परिषद ते लोकसभा, विधानसभापर्यंत फक्त काँग्रेसनेच केला आहे, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-येडियुरप्पांनी कर्नाटकमध्ये अखेर कमळ फुलवलं; बहुमत परीक्षणात पास

-बिचुकले इज बॅक; ‘या’ दिवशी घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री

-राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

-…नाहीतर 288 जागा जाहीर करणार- प्रकाश आंबेडकर

-अखेर मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ ठरला; ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या