महाराष्ट्र मुंबई

“शरद पवार शिवसेनेत येतील असं वाटत नाही”

मुंबई | सचिन अहिर आले असले तरी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शिवसेनेत येतील, असं वाटत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जोरदार चिमटा काढला आहे.

पक्ष फोडणं ही शिवसेनेची भूमिका नाही. मला फोडलेली माणसं नको आहेत. मनानं जिंकलेली माणसं हवी आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक, सर्व सोबत आहेत. शिवसेनेची नव्हे, तर मराठी माणूस आणि हिंदूंची ताकद वाढत आहे. मराठी माणूस आणि हिंदूंकडे कोणीही वाकड्या नजरेनं पाहणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्राह्मणांमध्येच खास गुण असतात; केरळ हायकोर्टाच्या न्यायाधीशाचा दावा

…अन् जितेंद्र आव्हाड तोंडावर पडले; ‘ते’ ट्विट केलं डिलीट

मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी वडील, भावाने दिले सिगारेटचे चटके

-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा

-आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला ‘हा’ खेळाडू होणार भारताचा फिल्डिंग कोच?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या