बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली”

ठाणे | ठाण्यात आज महारक्तदान शिबीरचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजीत करण्यात आलेलं शिबीर हे पुढील सात दिवस चालणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना एक सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचं लक्ष त्यांच्याकडे ओढलं गेलं आहे.

‘हल्ली राजकारणात नवी कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली आहे. त्यांच्या असे महारक्तदान शिबीर घेण्याची हिंमत आहे का?’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केला आहे.

पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, तुम्ही आवाहन केलं तर रक्तदानासाठी अशी गर्दी उसळेल का? आम्ही बघत नाही हे रक्त कुणाला जातं. ज्याला आवश्यक आहे त्याला रक्त जात आहे. जीवदान देणारे हे कार्यक्रम कुठे दिसत नाही. कर्तव्य म्हणून शिवसैनिक हे मोठं काम करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात नुकतच झालेल्या पंजायत समिती आणि जिल्हा परिषद पोटनिवणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. सगळेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची खेळी करत आहे.

थोडक्यात बातम्या – 

भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार?, नवाब मलिकांचं भाजपला खुलं आव्हान

सैनिकहो तुमच्यासाठी!; देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा अभूतपूर्व सन्मान सोहळा

मोठी बातमी! प्राप्तिकर विभागाकडून 1050 कोटी रूपयांचा घोटाळा उघड

‘हे ही दिवस जातील, अपना टाईम भी आयेगा’, पवारांवरच्या छापेमारीवर संजय राऊत म्हणाले…

MI vs SRH: प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी मुंबईला खेळावी लागणार अफलातून खेळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More