शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

नाशिक | शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेने आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच कर्जमाफी केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही, असं आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. 

पाहा उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या