बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई, महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्यांचा कंगणावर हल्लाबोल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगणा राणावतने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. शिवाय मुंबई मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिर अशी केली होती. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंगणावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “घरी खायला मिळत नाही आणि मुंबईत यायचं. आणि वर दाखवायचं आम्ही कष्ट केलेत. मुंबई आणि महाराष्ट्रचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, महाराष्ट्राची बदनामी कशाला करायची?”

“मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे. मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे,” असं उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले.

“मुंबई पोलिस काही काम करत नाही, शिवाजी पार्कात गांजा चरसची शेती आहे तसंच चरस गांजा उघड विकला जातो, असं म्हणणाऱ्यांना हे माहिती नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीत घरासमोर तुळसी वृदांवनं आहेत. गांजाची वृदांवन नाहीत, तुमच्या घरी गांजाची शेती असेल,” अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?- नितेश राणे

राज्यातील तरूणांनी उद्योगधंद्याकडे वळावं; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

“बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत”

“भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More