बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“30 वर्ष युती होती तेव्हा काही झालं नाही आणि आता एकत्र आल्यावर काय होणार आहे?”

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. दोन दिवसीय अधिवेशनात मोठ्या घडामोडी घडल्या. सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. समारोप झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तब्बल 30 वर्ष भाजप आणि शिवसेनेची युती होती. तेव्हा काही झालं नाही आणि आता एकत्र आल्यावर काय होणार आहे? माझ्या दोन्ही बाजूला बाळासहेब थोरात आणि अजित पवार बसले आहेत. मी यांच्यामधून उठून कुठे जाणार आहे.

काल विधानसभेत जो गदारोळ उडाला त्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाष्य केलं आहे. विधानसभेत झालेल्या राड्यामुळे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले बाळासाहेब थोरातही अवाक् झाले. मी तर अगदीच नवखा असून कालचा संपूर्ण प्रकार पाहून उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला असल्याचं पाहायला मिळतयं असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच आम्ही ओबीसींना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारकडे माहिती देण्याची मागणी केली. यात काय गुन्हा केला? भाजप सत्तेत असताना त्यांनीही ही माहिती मागितली होती. मग जर त्या माहितीत 8 लाख चुका होत्या तर तुम्ही ती कशासाठी मागितली होती?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

पत्रकारांच्या स्वातंत्र्यांवर गदा आणणाऱ्या जागतिक पातळीवरील नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचं नाव

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

”या’ प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा’; निवेदिता सराफ यांची मुख्यमंत्र्यांसह, राज ठाकरेंना विनंती

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक केव्हा होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

‘उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला’; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More