सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता; तसं अवनीच्या मृत्यूचं पापही घ्या!

संग्रहित फोटो

मुंबई | अवनी वाघिणीच्या हत्येनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

खरं-खोटं माहित नाही, मात्र अवनीप्रेमींनी मुनगुंटीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर सुधीर मुनगंटीवार काही बंदूक घेऊन अवनी वाघिणीला गोळ्या घालायला गेले नव्हते, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होते, असं ते म्हणाले.

त्यावर जो सर्जिकल स्ट्राईक आमच्या सैनिकांनी केला. तेव्हा नरेंद्र मोदीही बंदूक घेऊन सर्जिकल स्ट्राईक करायला गेले नव्हते. मात्र त्या सैनिकांच्या शौर्याचे श्रेय त्यांनी घेतलं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, सैनिकाच्या शौर्याचे श्रेय जसं घेता तसं अवनीच्या मृत्यूचं पापही सुधीर मुनगंटीवार आणि सरकारने घेतलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरोपांमुळे मुनगंटीवार संतापले; निरुपमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

-मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस आहे; संजय निरुपमांचा आरोप

-संजय दत्तने छायाचित्रकारांना हासडल्या अत्यंत घाणेरड्या शिव्या

-#MeToo | नवाजुद्दीनने मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला!

-आग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या