आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | मी अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडून दिला असे नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

राम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार आहे. राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

राम मंदिराबाबत न्यायालयाकडे बोट दाखवून चालणार नाही. हा विषय कायदा करुनच सोडवावा लागेल, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

दरम्यान, 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये सभा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. ही सभा फक्त कुंभकर्णाला जागं करण्यासाठीच असेल, असं त्यांनी म्हटलं. 

महत्वाच्या बातम्या-

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद

-माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात- नरेंद्र मोदी

-दंगलीची माहिती असेल तर पोलिसांना द्या; शिवसेनेनं राज ठाकरेंची उडवली खिल्ली

-मीही शरद पवारांना भेटणार होतो- दीपक केसरकर