जनतेच्या हितासाठी मी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार- उद्धव ठाकरे

नाशिक | जनतेच्या हितासाठी मी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ते नाशिकमधील निफाड येथील विकासकांमांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. 

शिवसेना सत्तेत राहून सरकारवरच टीका करते, असा अनेकांचा आक्षेप आहे. मी मात्र सरकार टीका करत नाही, तर जनतेच्या बाजूने बोलतो, असं उद्धव यांनी म्हटलं आहे.

 मागील काही दिवसांमधील शिवसेना-भाजप तणावाबाबत; आता दिवाळीचे फटाके बाजूला ठेवूयात आणि चांगले दिवे लावूयात, असं सुचक वक्तव्य त्यांनी केलं. 

दरम्यान, लवकरच आपण राम मंदिराच्या भूमीपूजनाला एकत्र जाऊया, असंही उद्धव यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-एकनाथ खडसेंचा ‘गॉडफादर’ कोण?; काय म्हणाले खडसे…

-#MeToo | ते संबंध संमतीने नव्हे तर भीतीने प्रस्थापित केले होते!

-उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांचा एकाच गाडीनं प्रवास

-मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

-दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ; आणखी एका गुन्ह्याची नोंद