मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी चाणक्य नितीनं राज्यकारभार करतात, अमित शहांच्या या विधानाचा शिवसेनंन चांगलाच समाचार घेतला आहे. थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का? असा सवाल शिवसेनेनं सामना मुखपत्रातून केला आहे.
देशातील मोठी राज्यं उद्याचं राजकीय भविष्य ठरवणार आहेत, पण या राज्यांची मानसिकता आता बदलत आहे. त्यामुळे बोलघेवडेपणातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही, असंही त्यात म्हटलंय.
भावनिक विषयांना हात घातले जातात तेव्हा सरळ दंगलींना आमंत्रण दिलं जातं. राजकारण अशा पद्धतीनंच करावं व निवडणुका जिंकाव्यात हे चाणक्याचंही सूत्र नव्हतं.,अशी टीका सामनातून केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-भिडेंना वारीत पुढं करून दंगल घडवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर
-शरद पवारांसारखा मराठा पंतप्रधान व्हावा, हीच भिडे गुरूजींची इच्छा!
-मनसे बदलतेय; राज ठाकरेंची गुजराती समाजाच्या बैठकीला हजेरी!
-भिडेंनी संतपरंपरेचा आणि वारकऱ्यांचा अपमान केला- शशिकांत शिंदे
-मनू संतांपेक्षा श्रेष्ठ आहे असं संभाजी भिडे म्हणालेच नाहीत; शिवप्रतिष्ठानचा दावा