Top News

मलाही पाचवा भाऊ करून घ्या, म्हणजे शिवसेनेला चांगले दिवस येतील- उद्धव ठाकरे

नाशिक | शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडेंना चार भाऊ आहेत. मलाही पाचवा भाऊ करून घ्या म्हणजे शिवसेनेला चांगले दिवस येतील, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांनी एकतर्फी विजय मिळवला त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी दराडेंना विचारलं, तुम्हांला किती भाऊ आहेत?  तेव्हा दराडे म्हणाले, आम्ही चारजण आहोत. त्यावर ठाकरे म्हणाले, मलाही पाचवा भाऊ करून घ्या.

संघटन वाढवा एकजूटीने काम करा आणि येत्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी एकदिलाने काम करा, असं आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण

-जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे

-आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत-चंद्रकांत खैरे

-…तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक उरणार नाही- चंद्रकांत पाटील

-चंद्रकांत पाटील हे सर्वात जास्त भंपकमंत्री आहेत- प्रविणदादा गायकवाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या