आपण फक्त म्हणायलाच सत्तेत; उद्धव ठाकरेंचा खुलासा

सांगली | आपण म्हणायला सत्तेत आहोत, पण सत्ताधाऱ्यांपेक्षा लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. हे मी माझं भाग्य समजतो, असं वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. शिवसेनेनं आयोजित केलेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर संपर्कदौरे करून लोकांशी संवाद साधतो आहे. निवेदनाचा पाऊस आणि कामाचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. सामान्य लोकांची कामंच होत नाहीत. त्यामुळे लोकं मला निवेदनं देतात, असं ते यावेळी म्हणाले.

सरकारनं कर्जमाफी देऊ असं सांगितलं. त्यानंतर गणपती गेले, दसरा गेला, दिवाळी गेली. कर्जमाफी कधी देणार आहेत?, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.