राणेंनी बाळासाहेबांना उतारवयात यातना दिल्या!, त्यामुळे राणेंंना उमेदवारी नाही?

मुंबई | उतारवयात बाळासाहेब ठाकरेंना राणेंनी यातना दिल्या. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसेना नाराज असल्याचं समजतंय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय.  

विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी राणे निवडणूक लढवणार नाहीत. भाजपच्या साधारण 6 जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यापैकी एकाच्या नावावर मुख्यमंत्री शिक्कामोर्तब करणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, आजच्या बैठकीत 10 ते 12 जणांची नावं सुचवली जाऊ शकतात, त्यापैकी मोजक्या जणांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचं समजतंय.